Tuesday, 18 December 2018

सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, 2 रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सांगलीतील श्री लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा मंदाकिनी शिंदे यांची जागतिक कीर्तीचे 'हाय रेंज' व 'मार्व्हलस रेकॉर्ड' बुकमध्ये नोंद झाली आहे.

'इंडियाज फस्ट वूमन बँक' अशी त्यांची दोन्ही रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे, यामुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गेल्या ४७ वर्षांपासून सांगलीतील 'श्री लक्ष्मी महिला सहकारी बँक' महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे.

या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे या बँकेच्या सभासदांपासून संचालक मंडळ आणि अध्यक्ष केवळ महिलाच आहेत.

जागतिक पातळीवरचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या 'मार्व्हलस बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड' यांनी या बँकेची दखल घेतली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य