Saturday, 15 December 2018

शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून 'गुड न्यूज'...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मंजूर झाल्याचे   केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

गहू, हरभरा, मोहरी, मसूर यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे.

"चालू आर्थिक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत 105 रुपयांनी वाढ केल्याचा" निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रत्येक पीकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव निश्चितच मिळेल असा दावा सरकारी सूत्रांनी केला. त्यामुळे सर्व पीकांना 50 टक्के फायदा होईल, असं सरकारचं म्हणणं आहे.

रब्बी हंगामातील सर्व 6 पीकांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हाचा हमीभाव 105 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात आलं आहे. सध्याचा दर 1735 रुपये प्रति क्विंटलवरुन 1840 रुपये इतके झाले आहे.

आधी हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,440 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जात होती. आता हरभऱ्याला 4,620 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जाईल.

तर मसूर डाळीला 4,475 रुपये प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत मिळेल. याआधी ती 4,250 रुपये इतकी होती. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य