Sunday, 20 January 2019

कोल्हापूरातील बसचालकाने केली एसटीची कायापालट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

एसटी म्हंटल की फुटक्या काचा, फाटक्या सीट, गळके छत आणि कधीही रस्त्यावरती बंद पडू शकणारे वाहन अशीच प्रतिमा गेल्या काही वर्षांपासून झाली आहे.

मात्र कोल्हापुरातील एका एसटी चालकाने 2 बस दत्तक घेऊन त्यांचा कायापालट केला आहे.

कर्मचाऱ्यांनी एसटीच्या प्रती आपुलकी दाखवली तर काय होऊ शकते याचे उदाहरण या चालकाने प्रत्यक्षात दाखवून दिले आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी खऱ्या अर्थाने प्रवाशांना सेवा देणारी ठरेल असा प्रयत्न कोल्हापूरच्या संभाजीनगर आगारातील चालक बाळासाहेब कांबळे यांनी केला आहे.

19 वर्ष एसटी मध्ये सेवा बजावणाऱ्या बाळासाहेब कांबळे यांनी एसटी प्रति आपलेही देणे लागते या भावनेतून 2 बस दत्तक घेऊन त्याचा कायापालट केला आहे.

त्यांचा हा उपक्रम हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला आहे, खाजगी बसेस मध्येही उपलब्ध होणार नाहीत अशा सेवा त्यांनी एसटी बसमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

प्रवाशांना सुरक्षित प्रवास होण्याबरोबरच एसटी महामंडळाचे उत्पन्नही वाढावे या दृष्टीने बाळासाहेब कांबळे यांनी हे पाऊल टाकले आहे.

 

बाळासाहेब काबळेंनी कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत?

  •  एसटीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावटीद्वारे प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
  • यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातील काही रक्कम खर्च केली आहे.
  • तर याबाबतची मोठी कामे स्वतः वर्कशॉपमध्ये बसून पूर्ण करून घेतली आहेत.
  • रस्त्यावर फिरताना एसटी सुरक्षित राहील याची खबरदारीही याद्वारे त्यांनी घेतली आहे.

बाळासाहेबांच्या या कामगिरीनंतर या बसमधून प्रवास करणारे प्रवासी या सुविधेबाबत समाधान व्यक्त करत आहेत.

तसेच अशाचं सुविधा इतर एसटी बसेस मध्ये उपलब्ध केल्या तर प्रवासी एसटी महामंडळाकडे आपोआपच आकर्षित होतील असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य