Wednesday, 16 January 2019

दहीहंडीला उपस्थित नसतानाही संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

पुण्यातील सहकार नगर पोलिस स्टेशनमध्ये अभिनेता संतोष जुवेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरण्येश्वर मित्र मंडळाकडून बेकायदा दहीहंडीसाठी स्टेज उभारल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष सागर खोत, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, स्टेज कॉन्ट्रॅक्टर आणि अभिनेता संतोष जुवेकर विरोधात सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाला संतोष जुवेकर आलाच नसताना देखील पोलिसांनी जुवेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अरण्येश्वर भागात संतोष जुवेकर याचे बॅनर्स लागले होते. त्यामुळे त्याचे पोस्टर पाहून पोलिसांनी जुवेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष जुवेकरला न विचारता, न बोलता त्यांच्या विरोधात सहकार नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे सहकार नगर पोलिसांवर सध्या पुण्यात जोरदार टीका केली जात आहे.

यानंतर जुवेकर दही हंडी कार्यक्रमात आले होते का नाही, याची आता सहकार नगर पोलिस शहानिशा करत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य