Thursday, 15 November 2018

आता तरी बंदोबस्त करा!, मनसेचं चक्क भुंकत आंदोलन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

लातूर शहरातल्या मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी मनसेच्या वतीनं अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन महानगरपालिकेत करण्यात आलं आहे.
शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या आणि कुत्र्यांमुळे होणारे अपघात वाढले आहेत.

मात्र याकडे मनपाचं दुर्लक्ष असून हि बाब निदर्शनास आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुत्र्यांचे मास्क लावून चक्क कुत्र्यासारखं भुंकत मनपा आयुक्तांना निवेदन दिलं.
तसेच मनपाच्या आवारातही भुंकत हे अनोखं आंदोलन केलं आहे.

हे आगळं वेगळं आंदोलन पाहण्यासाठी मनपाच्या आवारात नागरिकांनी मात्र गर्दी केली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य