Saturday, 15 December 2018

गोव्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर होणार कारवाई...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, गोवा

पुढील महिन्यापासून गोव्यामध्ये कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना अथवा अस्वच्छता करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरचं गोवा सरकार काढणार आहे, असं पर्रिकर यांनी सांगितल आहे.

येत्या 15 ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरूवात व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन, असंही पर्रिकर यांनी सांगितलं आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यापासून कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच त्या व्यक्तीकडून जवळपास 2500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

  • गोव्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतीही व्यक्ती  दारू पिताना अथवा अस्वच्छता करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार.
  • गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची घोषणा.
  • जवळपास 2500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
  • 15 ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरूवात.
loading...

Top 10 News

राशी भविष्य