Saturday, 15 December 2018

बारावी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (बुधवार, दिनांक ३० मे ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर बारावी परीक्षेचा निकाल उपलब्ध होणार आहे. 

निकाल या वेबसाईटवर पाहता येणार

एसएमएसद्वारे निकाल कसा बघणार?

बीएसएनएलच्या ग्राहकांना मोबाईलवरही बारावीचा निकाल जाणून घेता येईल.  बीएसएनएल ग्राहकांनी मेसेजमध्ये MHHSC <space><seat no> टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवावा.

दहावीचा निकाल जाहीर...यावर्षीही मुलींनीच मारली बाजी

सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल आज होणार जाहीर...

loading...

Top 10 News

राशी भविष्य