Thursday, 17 January 2019

आंब्यांवर केमिकल फवारणी करणारा व्हिडिओ व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज

आंबे विकत घेण्याचा हाच हंगाम असतो आणि नेमक्या याच काळात आंब्यांवर रसायने फवारली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एपीएमसी फळ बाजारात आंब्यांवर केमिकल फवारणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आंबे विकत घ्यायचे की नाही, हा प्रश्न पडला आहे.

आंब्याला योग्य उष्णता मिळावी व तो लवकर तयार व्हावा यासाठी इथिलीन हे सोल्यूशन फवारण्यास शासनाची मान्यता आहे. परंतु, काही व्यापारी कार्बाइड या मान्यता नसलेल्या केमिकलचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध विभागाच्या 10 टीमनी आज येथील बाजारातील अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी केली. त्यांनी संशयास्पद वाटणारे केमिकल तपासणीसाठी ताब्यात घेतले. यावेळी व्यापाऱ्यांनी केमिकल स्प्रे न करता आंबे तयार करण्यासाठी रॅपिंग चेंबरचा वापर करण्याचं आवाहन फ्रूट एन्ड व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या सचिवांनी केलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य