Tuesday, 22 January 2019

गणित चुकल्यानं अमानुष मारहाण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, अहमदनगर

दुसरीतल्या रोहन जंजीरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याला गणित चुकल्यानं त्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अहमदनगरमधल्या पिंपळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतली घटना दहा तारखेला सकाळी अकरा वाजता घडली. कर्जत तालुक्यातल्या चंद्रकांत शिंदे नावाच्या शिक्षकाने ही मारहाण केली. छडीनं तोंडातील अवयवांना जखमा झाल्यानं त्या विद्यार्थ्याला श्वसनास ञास झाला आणि त्याला ताबडतोब पुण्यातल्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात मुलाच्या आईने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य