जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये एमआयटी कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. सचिन वाघ असं विद्यार्थ्याचं नाव असून तो नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पेपर सुरू झाल्यानंतर तासाभरात तो कॉपी करताना पकडला गेला. त्यामुळे प्राध्यापकांनी त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढले. त्यानंतर तो कॉलेजच्या परिसरात फिरत होता साधारणतः बारा ते साडेबाराच्या सुमारास तो बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तो उडी मारणार हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याला खाली बोलावण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता अखेर त्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. अपमान होईल या भावनेतून त्याने उडी मारून आत्महत्या केली होती. यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.