Friday, 14 December 2018

कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमधील एमआयटी कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यानं कॉलेजच्या बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सचिन वाघ असं त्या विद्यार्थ्याचं नाव असून तो नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पाहिल्या वर्षात शिकत आहे. बिल्डिंगवरून उडी मारल्यानंतर तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.आज सकाळी सचिन वाघ हा नर्सिंग कोर्सच्या पहिल्या वर्षाचा पेपर देत होता.

पेपर सुरू झाल्यानंतर तासाभरात तो कॉपी करताना पकडला गेला. त्यामुळे प्राध्यापकांनी त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढले. त्यानंतर तो कॉलेजच्या परिसरात फिरत होता साधारणतः बारा ते साडेबाराच्या सुमारास तो बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तो उडी मारणार हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याला खाली बोलावण्याचा प्रयत्न केला.मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता अखेर त्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. या घटनेचा व्हिडीओ पाहताच अनेकांचा थरकाप उडालाय. 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य