Friday, 14 December 2018

राज्यभरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होणार तसचं काही ठिकाणी हलक्या पावसांच्या सरींची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतातील धान्यासह, इतरही बाबींची काळजी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करणायत आलं आहे.

दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण निर्मण झालं आहे. या भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

बुधवारी कोकणातील कुडाळ, सावंतवाडी परिसरात हलका पाऊस झाला. गोव्यातील डिचोली, वाळपईसह, केपे, पणजीसह राज्यभरात वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य