Sunday, 20 January 2019

संकट अजूनही टळलेलं नाही, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इशारा

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काही दिवसापांसून मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून गारपीटीची शक्याता दर्शवली गेली आहे.

मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं हा वर्तवला आहे. आधीच बोंड आणि नापिकी शेती यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यातचं कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि आता नवीन संकट म्हणून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला. आणि अजूनही हे संकट टळलं नसल्याचं दिसून येतंय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानंतर आता शेतकऱ्यांच्या संकटामध्ये अधिकच वाढ झालीय.

23 फेब्रुवारीला वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये गारपिट होण्यची शक्यता आहे. यामुळे, शेतकऱ्यांनी अपल्या शेतातपेरलाल्या ज्वारी, कापूस, पिकं उघड्यावर सोडू नये असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

कापणीवर आलेल्या पिकांची कापणी करुन ती साठवावी. तसेच, पिकांची साठवण करण्यासाठी ताडपत्रीचा वापर करुन पिकांचं संरक्षण करावं. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनीही शेतमालाची सुरक्षित साठवणूक करावी. वादळी वारे, विजा आणि गारपीटीपासून गुरा-ढोरांचं संरक्षण करावं. असंही हवामा खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य