Sunday, 20 January 2019

रेल्वेकडून मुंबईकरांना थर्टी फस्ट गिफ्ट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

मध्य रेल्वेकडून मुंबईकरांना थर्टी फस्ट गिफ्ट देण्यात आले आहे. 31 डिसेंबरला रात्री मध्य,हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर धावणार विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर 8 तर मध्य रेल्वेवर 4 गाड्या धावणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरही विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

 

मध्य रेल्वे मार्गावरील विशेष लोकल

सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल.

 

पश्चिम रेल्वे मार्गावरील विशेष लोकल

पश्चिम रेल्वेची विशेष (लोकल 1) चर्चगेट-विरार ही लोकल चर्चगेटहून रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी निघेल. रात्री 2 वाजून 55 मिनिटांनी विरार येथे पोहोचेल.
विशेष लोकल (लोकल २) विरार-चर्चगेट विरार येथून 12 वाजून 15 मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला 1 वाजून 47 मिनिटांनी पोहोचणार आहे.
विशेष लोकल (लोकल ३) चर्चगेट येथून रात्री २ वाजता निघणार असून, विरारला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.
विशेष लोकल (लोकल ४) विरार येथून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पोहोचेल.
विशेष लोकल (लोकल ५) चर्चगेट येथून रात्री २ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी विरार येथे पोहोचेल.
विशेष लोकल (लोकल ६) विरार येथून १ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री ३ वाजून १२ मिनिटांनी पोहोचेल.
विशेष लोकल (लोकल ७) चर्चगेटवरून रात्री ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून, विरारला पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल.
विशेष लोकल (लोकल ८) विरार येथून रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला पहाटे ४.३७ मिनिटांनी पोहोचणार आहे.


हार्बर रेल्वे मार्गावरील विशेष लोकल
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल सोडली जाईल. पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड व मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विशेष लोकल सोडल्या जातील. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य