Tuesday, 11 December 2018

उपराजधानी की गुन्ह्यांची राजधानी? भरदिवसा बाजारात दांमप्त्याला मारहाण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरच्या सीताबर्डी बाजारात भर दिवसा खरेदी करणाऱ्या नवदाम्पत्याला खरेदीची वाटाघाटी करत असताना फेरीवाल्यानी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

सोमवारी नागपूरच्या सीताबर्डी मार्केट मधील मेन रोड येथे युको बँकेच्या समोर ही घटना घडली आहे. एवढच नाहीतर पतीसमोरच महिलेला मारहाण करण्याची घटना घडली आहे.

गेले काही दिवस नागपूरातील घटना पाहिल्यावर नागपूरात पोलिसांची भीतीच उरली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. नवदाम्पत्य बाजारात कपड्यांची खरेदी करण्यास गेला असता किमतीवरून वाटाघाटी सुरू झाली. वाटाघाटी करताना दोघांनी टोकाची भूमीका पकडली. दरम्यान, थोडी बाचाबाची सुरू झाली आणि दुकानदाराने मारहाण करण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे जेव्हा हा प्रकार घडत होता त्याठिकाणी आजूबाजूला फेरिवाले सुद्धा होते. मात्र त्यांनी तोंडावर रुमाल बांधून फक्त बघ्याची भूमीका घेतली.

तर, काहींनी येऊन हा प्रकार थांबवण्या ऐवजी फेरीवाल्यांची बाजू घेत त्या दामपत्यालाच मारहाण करण्यास सुरूवात केली. हा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला. त्यात भर म्हणून या ठिकाणी पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे इथल्या व्यापाऱ्यांच ही म्हणणं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य