Saturday, 15 December 2018

बैलगाडा शर्यतींवर तूर्तास बंदी - सर्वोच्च न्यायालय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

राज्यातील ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीवर प्राणीमित्रांनी आक्षेप घेतलाय. या शर्यतीमुळं बैलांना यातना दिल्या जातात. यामध्ये अनेक जनावरं जायबंदी होतात, असे या प्राणिमित्रांचं म्हणणं आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. ग्रामीण भागात रुजलेली बैलगाडा शर्यत ही वेगवेगळ्या प्रकारे होते. एखाद्या गावात बैलगाडा स्पर्धा म्हणजे पंचक्रोशीतला एक उत्सवच असतो. पण आता या बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यतींना तमिळनाडू सरकारने परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही बैलगाडा शर्यंतीना परवानगी देण्याची अधिसूचना जारी केली होती. त्याला विरोध करीत प्राणीप्रेमी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी घेत उच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. या बंदीला सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी स्थगिती दिलेली नाही. मात्र, सांस्कृतिक हक्कांसाठी सरकारला असा कायदा करण्याचा अधिकार आहे की नाही, याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे. 8 आठवड्यानंतर खंडपीठासमोर हे प्रकरण येणार आहे.

 

 

बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांना अशा काही प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात :

बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगळणे

 बैलांना मारहाण करणे

 मद्य पाजणे

 खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे

 बैलांना विजेचे शॉक देणे

 शर्यतीत अनेक जनावरं जायबंदी

 जनावरांच्या डोक्याला जखम तर कधी डोळा निकामी

 बैलांवर उपचार न केल्याने जीव जाण्याच्या घटना

 महाराष्ट्र, कर्नाटकात शर्यत शौकिनांची संख्या अधिक

 जत्रांमध्ये हौस म्हणून बैलजोडी शर्यतीची परंपरा

 बैल सैरावैरा पळतांना शेकडो लोकंही जखमी

loading...

Top 10 News

राशी भविष्य