Wednesday, 16 January 2019

होय मी नक्षलवादी आहे, माझ्यावर खटला भरा – प्रकाश आंबेडकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

 

होय मी नक्षलवादी आहे, माझ्यावर खटला भरा, असे खळबळजनक वक्तव्य भारिप-बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

 

30 सप्टेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भाषण करतांना त्यांनी केंद्र सरकार, संघ, कॉंग्रेस आणि सोनिया गांधींवर जोरदार टीका केली.

 

अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्र सरकारला आव्हान देताना त्यांनी "होय मी नक्षलवादी आहे, माझ्यावर खटला भरा,  मला काय करायचे ते करा", असं म्हटलंय. दरम्यान, संघाच्या दसरा कार्यक्रमातील शस्त्रपूजन कार्यक्रमावरही त्यांनी जोरदार टिका केली.

 

संघाच्या शस्त्रपूजनात एके-47 सह फक्त लष्कराला वापरण्याची परवानगी असलेली शस्त्र येतात कशी? असा सवालही आंबेडकरांनी केला.

 

काँग्रेस आणि सोनिया गांधींवरही आंबेडकरांनी जोरदार टिका केली. महिला आरक्षणासंदर्भात सोनिया गांधींनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातील भाषा सोनिया गांधी-काँग्रेसची शरणागती समजायची काय?  असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

तसेच, देशातील मुस्लिमांना त्यांनी काँग्रेसी मुस्लिमांपासून सावध राहण्याचं आवाहन केल. गौरी लंकेश हत्या प्रकरणात गप्प राहणाऱ्या काँग्रेसी मुस्लिमांनी संघ आणि सरकारसोबत हातमिळवणी केली काय? असा सवालही त्यांनी कार्यक्रमात विचारला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य