Sunday, 18 November 2018

त्या पाच वर्षीय चिमुकलीच्या हत्येचा अखेर उलगडा !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 जय महाराष्ट्र न्यूज, अकोला 

 

अकोल्यातील नायगाव परिसरातील चिमुकलीच्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. 10 सप्टेंबरला पाच वर्षीय आलियाचा नायगाव डंपिंग ग्रउंडवर पोत्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.  आलियाची हत्या तिच्या पित्यानेच केली असल्याचा खुलासा पोलिसांच्या तपासातून झाला आहे.

 

अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक रोकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत आलिया हत्याप्रकरणाची माहिती दिली.  शेख फिरोज शेख रशिद असं आरोपी पित्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज हा दारुच्या व्यसनात पुरता अधीन झाला होता.  

 

8 सप्टेंबरच्या रात्री दारुच्या नशेत फिरोजचं पत्निसोबत भांडण झाले होते. त्यानंतर नशेमध्ये त्याने स्वत:चीच मुलगी आलिया हीचा गळा दाबून आणि भिंतीवर डोके आपटून हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह पोत्यात भरून नायगाव डम्पिंग ग्राऊंडवर फेकून दिला. पोलिसांना हा मृतदेह 10 सप्टेंबरला नायगावच्या डंम्पिंग ग्राउंडवर सापडला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य