Wednesday, 17 October 2018

...म्हणून राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये- मुख्यमंत्री

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

'सरकारचा समृद्धी महामार्ग हा शरद पवारांच्याच संकल्पनेतून निर्माण केला जातोय' त्यामुळे किमान राष्ट्रवादी तरी याला विरोध करणार नाही असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकीर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडला होता. यावेळी पवार यांची वेगवेगळी 40 भाषणं मी काढली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

 

तसंच “विदर्भाच्या विकासासाठी सर्वाधिक महत्त्वाची कनेक्टीव्हिची असून नागपुरातल्या कारखानदारीला स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर वाहतूक व्यवस्था सुधारावी लागेल असं पवार यांनी 1982 मध्ये म्हटल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीनं तरी समृद्धीमार्गाला विरोध करु नये अशी गुगली मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाकली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य