Monday, 21 January 2019

मराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

- काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत देणार - सरकार
- काकासाहेब शिंदे यांच्या भावाला 8 दिवसात नोकरी देणार - सरकार
- शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळणार - सरकार
- काकासाहेब शिंदे यांना हुतात्मा दर्जा दिला जाणार 
- गंगापूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षाचं तातडीनं निलंबन
- काकासाहेब शिंदे यांच्यावर सकाळी 10 वाजता
- कायगाव टोक इथ पूलाजवळ होणार अंत्यसंस्कार
- पुणे- औरंगाबाद महामार्ग गेल्या 18 तासापासून बंद
- पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु

मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनात शहीद झालेले काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा संघटना आक्रमक झालेले पाहायला मिळतात मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलीय. दरम्यान राज्यात काही ठिकाणी आज बंदची हाक सुद्धा मराठा मूक मोर्चा यांच्याकडून देण्यात आली आहे, मात्र या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. पुण्यातली परिस्थिती सुरळीत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे...

मराठा क्राती मोर्चाने महाराष्ट्र पुकारलेल्या बंदमुळे हिंगोली आगाराच्या सर्व बस सेवा बंद ठेवण्यात आल्या असल्याचं एस टी बस स्थानक प्रशासनानं सांगितले हे बंद पुढील आदेश येईपर्यंत राहील तसेच मानव विकासच्या स्कुल बस देखील बंद आहेत.

जालना जिल्ह्यातील मंठा इथं मराठा क्रांती मोर्चाचा सातवा दिवस आहे. औरंगाबाद इथं काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा मृत्यु झाला, त्याच्या निषेधार्थ आज मंठामध्ये बंदचं आयोजन केलयं. सकाळपासून शहरातील सर्व दुकाने, हॉटेल बंद आहेत. शहरात पहाटेपासून हॉटेल सुरु असतात. सकाळी गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने घरी पाठवलयं. एरवी सकाळ पासून सुरु होणारा मुख्य बाजारात शुकशुकाट जाणवतोय.

परळी येथे सुरू असलेल्या ठोक मोर्चाचा आज सातवा दिवस आहे. ‘जो पर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही’ अशी भूमीका आंदोलकांनी घेतली त्यामुळे आंदोलन चिघळत चालेल आहे.

परळीच्या ठिय्या आंदोलंकाची एक मागणी वाढली आता आंदोलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत त्यामुळे आता आंदोलन अधिक आक्रमक करणार असल्याचे आंदोलन तरुण सांगत आहे .

मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. मात्र कोल्हापुरात बंद ऐवजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक दसरा चौकात 11 वाजल्यानंतर या आंदोलनाला सुरवात होईल. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याशेजारी हे आंदोलन करण्यात येणार आहे. हजारो कोल्हापूरकर यामध्ये सहभागी होणार आहेत.

परभणी जिल्ह्यात कड़कड़ीत बंद ठेवण्यात आलाय. शाळा,महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून 8 दिवसांत तब्बल 43 बसेस आणि 6 खाजगी वाहनांचे नुकसान झाले आहे. जिल्हाभरातील बस सेवा बंद ठेवण्यात आली तर पूर्णा,सेलु,जिंतुरात ठिय्या आंदोलन आणि पालम,गंगाखेड़,परभणी,मानवत,पाथरी,सोनपेठ बंद ठेवण्यात आले.

मराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...

मराठी क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू...

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य