Tuesday, 11 December 2018

विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण, पोक्सो कायद्यांतर्गत प्राध्यापिकेला अटक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

शाळेतील एका प्राध्यापिकेने अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची लांच्छनास्पद घटना घडली आहे. चिखलदऱ्याच्या शाळेमधील या प्राध्यपिकेविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून, पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित विद्यार्थी हा वसतीगृहात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून प्राध्यापिका, 'तू मला आवडतो, तू मला हवा आहे,' असे सांगत विकृत चाळे करत असे. घाबरलेल्या पीडित विद्यार्थ्याने याबद्दल शिक्षकांना सांगितले. विषयाचे गांभिर्य पाहता शाळा व्यवस्थापनाकडे संबधितप्रकरणाची माहिती देण्यात आली. व्यवस्थापनाने चौकशी समीतीसुद्धा आयोजीत केली.

चिखलदरा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्राध्यापिकेविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य