Monday, 17 December 2018

महापुरुषांचा अपमान; सावरकरांच्या पुतळ्यावर शाईफेकीनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी शाई फेकली. तीन दिवस उलटले तरी शाई फेकणाऱ्या समाजकंटकाला अटक करण्यात आली नसल्याने हिंदुत्त्ववादी संघटनांच्या नेत्यांनी आता पुन्हा पोलिसांना इशारा दिलाय. समर्थनगरातील पोलीस नियंत्रण कक्षाच्या जवळ घडलेल्या या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक आणि हिंदुत्त्ववादी संघटनेचे नेते जमा झाले. विटंबना करणाऱ्या विरोधात घोषणाबाजी करून रास्ता रोको केला.

मात्र पोलिसांनी 24 तासांत आरोपीला शोधू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तीन दिवसानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने हिंदुत्त्ववादी संघटनांचे नेते आक्रमक झालेत. सावरकरांचा जिथे पुतळा आहे, त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती. सुरक्षा रक्षकही नव्हता. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही नव्हते. त्यामुळे आरोपी कसा शोधायचा हा प्रश्न पोलिसांना पडला होता. शिवाय या निमित्ताने शहरातील 167 पुतळ्यांची सुरक्षा बेभरोसे असल्याचेही समोर आले आहे. आता, पोलिसही अडचणीत सापडलेत.कारण त्यांना काहीही पुरावा सापडत नाही.

शाई फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस काय करत आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढच्या पिढीला महापुरुषांचे स्मरण व्हावे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवा. म्हणून हे पुतळे उभारले आहेत. त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी याबाबत सामाजिक कार्यकर्ते जागृती करत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य