Thursday, 17 January 2019

कुणी पाणी देता का पाणी...?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

भीषण दुष्काळाने घेरलेल्या बीडमध्ये पाणीटंचाईचा वणवा दिवसेंदिवस भडकत चालला. जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडेठाक पडल्याने ‘पाणी’बाणी निर्माण झाली.

 

‘कुणी पाणी देता का पाणी ’ असे म्हणत नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडे नाही.

 

जुनाच कारभार दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. गेल्या 20 दिवसांपासून टँकरची मागणी करूनही आजतागायत या मागणीकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आलेलं आहे. मात्र, तहसीलदार आणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गोंधळात मात्र गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण मात्र तशीच सुरू आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य