Tuesday, 11 December 2018

कचराकुंडीत दोन दिवस तडफडून ही कोणी मदतीला आलं नाही, अखेर त्याला मृत्यूने कवटाळलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

माणुसकीला काळीमा फासणारी घटना औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली. एका वयोवृद्ध व्यक्तीला कोणीतरी शहरातील क्रांती चौक भागात असलेल्या कचराकुंडीच्या बाजूला टाकून गेलं. दोन दिवस हा वृद्ध उन्हातानात तडफडत होता. त्याला कोणीही मदत केली नाही. अखेर आसपासच्या काही तरुणांनी त्याला मदत केली. त्याला दवाखाण्यात उपचारांसाठी पोहोचवलं. मात्र, उपचारापूर्वी  त्यांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकातील काळीज हेलावून टाकणारी ही घटना आहे. दोन दिवस हा वयोवृद्ध अन्न पाण्यावाचून कचराकुंडी शेजारी तडफडत होता, असं सांगितलं जातंय. त्या वयोवृद्ध व्यक्तीबाबत विचारपूस केली असता, ही व्यक्ती कोण आहे आणि कोणी त्याला कचराकुंडी शेजारी आणून टाकले याची कुठलीही माहिती तेथील रहिनवाशांना नाव्हती. काही तरुणांच्या नजरेला या वृद्ध माणसाची तडफड दिसली.

तरुणांनी त्याला घोटभर पाणी पाजल आणि अंबुलन्स बोलावली. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्याला उपचारासाठी घेवून गेले. त्याचं दरम्यान, मात्र त्यांची प्राणज्योत मावळली. उतरत्या वयात अनेक जण आपल्या वयोवृद्धांना असं रस्त्यावर टाकलेल अनेकांनी पाहिलं असेल मात्र, कुणालाही त्यांची द्या आली नाही. अखेर काही तरुणांनी त्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आलं नाही. 

aurangabad-dustbin1.png

loading...

Top 10 News

राशी भविष्य