Monday, 22 October 2018

यवतमाळमध्ये पहिल्यांदाच पार पडला समलैंगिक विवाह

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

यवतमाळमध्ये पहिल्यांदाच समलैंगिक विवाह नुकताच पार पडला. शहरातील प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचा मुलाने गुरूवारी आपल्या इंडोनेशियनं मित्राशी विवाह केला. बक्कळ पगाराच्या नोकरीसह अमेरिकेत वास्तव्यकरत असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीही एका पायावर तयार होतं. परंतु, वर लग्नाला नकार देत असल्याने घरच्यांची काळजी वाढली होती.

घरच्यांकडून त्याला लग्न न करण्याचे कारण विचारले असता त्याने सगळी हकीकत आईवडिलांना सांगितली. आपण समलैंगिक विवाह करणार असल्याचं सांगितलं. मूळचा इंडोनेशियन असलेल्या आपल्या सहकाऱ्यावर त्याचं प्रेम जडलं, त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांनी नाईलाजास्तव लग्नास होकार दिला. त्यावेळी त्याच्या आईवडिलांच्या धक्काचं बसला.

वराच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. लग्नासाठी पॉश हटले बुक करण्यात आलं होतं. विवाहात सर्वच वैदिक चालीरिती पाळण्यात आल्या. लग्नापूर्वी वर-वधूला हळद लावण्यात आली, लग्नाचे कपडे, वेडिंग रिंग अशा पद्धतीने वैदिक मंत्रोच्चारात हे लग्न पार पडलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य