Tuesday, 18 December 2018

सिंदखेडमध्ये माँ जिजाऊंचा जन्मोत्सव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी, जाधवांची कन्या तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बुलडाणा जिल्ह्यात आज माँ जिजाऊंचा जन्मोस्तव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. सकाळी 7 वाजता जिजाऊंची आरती नगरपालिकेतर्फे पार पाडण्यात आली.

राजमाता माँ जिजाऊंच्या 420 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजातील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढण्यात आली. आज सिंदखेड राजा नगरीत लाखोंचा जनसमुदाय एकत्र येणार असून माँ जिजाऊंना वंदन करण्यासाठी अनेक दिग्गज मातृतीर्थ सिंदखेड नगरीत दाखल होणार आहेत.

विशेष म्हणजे काही वेळात दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य