Tuesday, 18 December 2018

...म्हणून विहिरीत ओतले दारुचे ड्रम; दारु मिश्रीत पाणी पिऊन अख्ख गाव झालं तर्राट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

पोलीस कारवाई करतील म्हणून औरंगाबादमध्ये  गावठी दारु बनविण्याऱ्यांनी दारुचे ड्रम विहिरीत ओतल्याने निमखेडी या गावाला दारुची झिंग चढलीय. 

ज्या विहिरीत गावठी दारुचे ड्रम ओतले होते. त्या विहिरीतून सोयगाव तालुक्यातील निमखेडी गावाला पाणीपुरवठा होतो. 

दारूमिश्रित पाणी पिल्याने काही जणांना उलटीचा त्रासही सुरू झाला तर काही जणांना दिवसभर झिंगल्यासारखे झाले. हा खळबळजनक प्रकार सोमवारी दिवसभर घडला. निमखेडी हे गाव मराठवाड्याच्या सीमेवर वसलेले गाव. या गावातील धरणालगत निमखेडी ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी विहीर बांधलेली आहे.

या विहिरीतून निमखेडीला पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. रविवारी गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. त्या वेळी पाण्यातून उग्र वास येत होता; परंतु पाण्यात जास्त प्रमाणात क्लोरिन टाकले गेले असावे, असा गावकर्यांचा समज झाला. मात्र, हे पाणी पिल्यानंतर अनेकांना गुंगी आली. तर काही जणांना  त्रास सुरू झाला. या गावकर्‍यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य