Sunday, 16 December 2018

रेडा आणि म्हैशींची मिरवणूक काढून साजरी केली आगळीवेगळी भाऊबीज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

राज्यात ठिकठिकाणी दिपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सणात आवडत्या वस्तूंची, फराळाची देवाण घेवाण करुन दिपावलीचा सण साजरा होतो. आज भाऊबीजच्या दिवशी बहिण भावाची ओवाळणी करते. तर, औरंगाबादमध्ये भाऊबीजेला एक वेगळेच महत्व आहे.

औरंगाबाद शहरातील गवळी समाज रेड्यांची आणि म्हशींची सगर म्हणजेच मिरवणूक दरवर्षी मोठ्या उत्साहाने काढत असतात. ही सगर म्हणजे औरंगाबादची एक ओळख आहे. सजवलेले रेडे आणि म्हशीची मिरवणूक काढून औरंगाबादेमध्ये आगळा वेगळा भाऊबीजचा सण साजरा केला जातो. असे म्हणतात कि, म्हैस हे लक्ष्मीचे रूप आहे, तर रेडा हा यमाचे वाहन आहे.

रेड्याची पूजा केल्याने नवीन वर्षात कुठल्याही अडचणी येत नाही. राजाबाजार आणि गवळी पुऱ्यात होणाऱ्या या सोहळ्यात रेड्यांना सजवून त्याची मिरवणूक काढली जाते. ढोल तश्यांच्या गजरात रेड्यांचे मालक मोठ्या उत्साहात त्यांची मिरवणूक काढतात. गवळी समाजातर्फे रेड्यांची पूजा केली जाते. निजामकाळापासून ही अनोखी प्रथा शहराच्या मध्यभागी पाळली जात आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य