Friday, 18 January 2019

तब्बल 9 वर्षानंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरण ओव्हर फ्लो

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण 97 टक्के भरले आहे. सतत दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात तब्बल 9 वर्षानंतर जायकवाडी धरण भरल्याने यंदा हे पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे.

 

जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे अर्ध्या फुटांनी उघडण्यात आले आहे. त्यातून 10 हजार क्युसेकने पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग होतो आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

याआधी जायकवाडीतून 2007 मध्ये अडीच लाख क्युसेक आणि 2008 मध्ये 1 लाख क्युसेकने पाणी सोडले होते. त्यावेळी अनेक गावांना पुराने वेढले होते. त्यामुळे अधिक वेगाने विसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत, धरण 97 टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य