Monday, 21 January 2019

केरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केरळ राज्यात निफाह नावाचा व्हायरस पसरल्याने अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत, सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने नाशिक मधून अनेक नागरिक पर्यटनासाठी केरळ मध्ये गेले आहेत, तसेच अनेक केरळ बांधव नाशिक मध्ये वास्तव्यास आहेत, त्यामुळे खबरदारी म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालयात या आजारासाठी एक वेगळं कक्ष तयार करण्यात आलं आहे.

सुदैवाने अद्याप एकही रुग्ण नाशिक मध्ये आढळून आले नसले तरी खबरदारी म्हणून नाशिक आरोग्य विभागाकडून हे कक्ष नाशिक जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलं आहे. निफाह आजरावर अद्याप कुठल्याही योग्य उपचाराची सुविधा नसल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

केरळमध्ये पर्यटनासाठी नाशिकमधील अनेकजण गेले आहेत केरळात गेलेल्या नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधता माघारी येण्याची देखील सांगितले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य