Monday, 17 December 2018

अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची निवड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

छिंदम प्रकरणी पश्चाताप म्हणून भाजपनं उपमहापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि इतर गटांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे बोरुडे यांची बिनविरोध निवड होण हे निश्छीत होत. छिंदमच्या लाचखोर प्रकरणामुळे नगरचं उपमहापौरपद रिक्त झालं होतं.

उपमहापौरपदाची निवडणूक सुरु होताच राष्ट्रवादी, मनसे आणि बंडखोर गटाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला. छिंदम प्रकरणी पश्चाताप म्हणून भाजपनं उपमहापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर भाजप निवडणूक प्रक्रियेतही सहभागी झालं नव्हतं. तर घोडेबाजार होऊ नये म्हणून राष्ट्रवादीनं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं पक्षानं सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला गेल्या महिन्यात उपमहापौरपदावरुन निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे अहमदनगरचं उपमहापौरपद रिक्त होतं.

अहमदनगर महापालिकेत 26 फेब्रुवारीला भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य