Friday, 14 December 2018

सावकराकडून "तिने" परत मिळवले दागिने; महाराष्ट्रातील पहिलीच घटना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

 

सावकाराच्या जाचाला कंटाळून आजवर अनेकांनी आत्महत्या केली आहे. मात्र, सावकारी विरोधात पीड़ित तक्रार करण्यास घाबरतात. मात्र, सरकारनं अवैध सावकारी विरोधात कायद्यात कठोर तरतूद केल्या आहेत.

त्या कायद्यानुसार तक्रार केली तर, आपले मेहनतीने जमवलेले दागिने सावकराकडून प्राप्त करु शकतो याचं एक उदाहरण यवतमाळ येथील उमरखेड़ येथे पहावयास मिळत आहे.

यवतमाळमधील एका महिलेनं सावकारविरोधात केलेल्या तक्रारीनंतर सावकार दोषी आढळल्यानं त्या महिलेला सावकराकडील जप्त सोने- चांदी परत करण्यात येणार आहे.

ही महाराष्ट्रातील पहिली घटना असावी असे सहकारातील जनकारांचे म्हणणे आहे. आजवर स्थावर मालमत्ता मुळ मलकास परत करण्यात आली आहे मात्र जंगम मालमत्ता वाटपाची ही पहिलीच घटना आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य