Thursday, 17 January 2019

आईने अडीच वर्षीय मुलीसह केली आत्महत्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

आई आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाचीही परवा करत नाही, आपल्या बाळाला काही इजा झाली की आईचा जीव कासावीस होतो. पण, नाशिकमध्ये विचित्र प्रकार घडलाय. आईने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सुप्तश्रुंगी गडाजवळ दरीमध्ये अडीच वर्षीय चिमुरडीसह एका विवाहितेचा मृतदेङ आढळला आहे.

अडीच वर्षीय मुलीसह महिलेने नाशिकच्या शीतकडा येथून उडी घेवून आत्महत्या केल्या प्राथमिक अंदाज वरतवला जात आहे. वंदना निफाडे असे या महिलेचे नाव आहे. वंदना निफाडे या शिरवाडे वणी या गावात राहत होत्या. पण आत्महत्येचं कारण मात्र, अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास घेत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य