Friday, 18 January 2019

केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 7 जण गंभीर जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जळगावमधील एम आयडीसी परिसरात गीतांजली केमिकल नावाच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीये. रात्री साडेनऊच्या सुमारास हा स्फोट झाला असून त्यावेळी 30 ते 35 कामगार कंपनीमधे कामा करत होते.

काही कामगारांना आपला बचाव करण्यास यश आलं आणि ते कंपनीबाहेर निघाले. मात्र कामगारांपैकी 7 कामगारांना बाहेर पडण्यास अपयश आले. जखमीं कामगारांच्या अंगावर केमिकल पडल्याने ते गंभीर रित्या भाजले गेले.

परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, मोठ्या प्रमाणावर अॅसिडच्या वाफा बाहेर पडत असल्यानं बचावकार्यदेखील अवघड बनलं होतं. या स्फोटात 7 जण गंभीररीत्या भाजले गेले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परिसरातील नागरिकांनी जखमींची मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट असून संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य