Tuesday, 18 December 2018

केळ्यातून नकली नोटांची तस्करी; व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

केळं सोललं तर काय मिळेल? तसा तर मस्त चविष्ट केळ्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. मात्र, जळगावच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पोस्ट झालेला हा व्हिडिओ धक्कादायक असला तरी हा व्हिडिओ नकली आहे. 

 

केळं सोलताच आत एक गुंडाळी निघतेय. ती गुंडाळी उघडली तर आतमध्ये नोटाच नोटा. अशी गुंडाळी एकाच केळ्यात नाही. एकामागोमाग केळी सोलली तर आतमध्ये नोटांची गुंडाळीच गुंडाळी. आता खरंतर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

 

पण त्याला फारतर आम्ही न्युजी व्हायरल म्हणून चालवून पुढे गेलो असतो. पण केळ्यातून नकली नोटांची तस्करी आणि तिही पाकिस्तानातून होत असल्याचा आरोप केलाय तो जळगावातले भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार चंदूभाई पटेल यांनी.

 

जळगावच्या प्रतिष्ठितांच्या डायमंड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ आमदार चंदूभाई पटेल यांनीच पोस्ट केलाय. त्यांनी पुढे लिहिलंय. पाकिस्तानातून भारतात नकली नोटा कशा येतात ते पाहा.

 

त्यांच्या इंडियाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक असल्याने एका पप्पू चौधरी नावाच्या ग्रुप सदस्याने त्यांची चूक लक्षातही आणून दिलीय. मात्र जळगावचे महापौर ललित कोल्हे अॅडमिन असलेल्या ग्रुपमध्ये असलेल्या जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी त्याची दखल का घेतली नाही, असा प्रश्न स्थानिक पत्रकार दिलीप तिवारी यांनी विचारलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य