Wednesday, 17 January 2018

चोरट्यांच्या टोळीत चक्क पोलीस झाला सामिल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस दल नेहमी तत्पर असते असे म्हटले जाते. पण, अनेकदा याच पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाला मान खाली घालण्याची वेळ येते. अशीच वेळ जळगावच्या पोलीस विभागावर आली आहे.

मालामाल बनण्याच्या हव्यासापोटी काही चोरट्यांनी ट्रक चालकाची लुट केल्याची घटना घडली. 12 सप्टेंबर च्या रात्री एका ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 4000 रुपये चोरटयांनी लंपास केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडली. त्यानंतर मोठ्या हिमतीने या ट्रक चालकाने जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले. मात्र, तपासादरम्यान चोरांनी दिलेल्या माहितीनुसार एका पोलिस कर्मचाऱ्याचादेखील या चोरीत समावेश असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. सुशीर मगरे असे या दगाबाज पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी या चोरट्यांसोबत दगाबाज पोलीस कर्मचाऱ्यालादेखील अटक केली आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News