Wednesday, 19 December 2018

'संदर्भ’ हॉस्पिटलची दुरावस्था

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक 

 

नाशिकच्या शासकीय ‘संदर्भ’ हॉस्पिटलमधील 50 कोटीच्या 36 यंत्रणा बंद असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून या यंत्रणा बंद असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

 

गरीब रुग्णांना मोफत सेवा मिळावी यासाठी 2008 मध्ये शासनाने करोडो रुपये खर्च करून विभागीय संदर्भ हॉस्पिटल सुरू केलं होत.

या ठिकाणी कॅन्सर आणि हृदयरोग सारख्या गंभीर आजारांवर आजपर्यंत हजारो रुग्णांनी मोफत उपचार घेतलेत. मात्र गेल्या सहा

महिन्यांपासून 50 कोटींच्या 36 यंत्रणा बंद असल्याने अनेक  रुग्णांचे हाल होत आहेत.

सुरवातीला या ठिकाणी ‘सिमेंस या कंपनीकडून यंत्रणा बसवण्यात आल्या होत्या मात्र त्यांना यंत्रणा बसवण्याचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत.

रेडिएशन सारखे आठ कोटी रुपयांचे मशीन ज्याचे 16 लाखांचे पार्ट खराब झाल्याने गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. शासनाला वारंवार

पत्र व्यवहार करून सुद्धा याची दाखल घेतली जात नाही.

उत्तर महाराष्ट्रातून आजवर हजारो गरीब रुग्णांनी या ‘संदर्भ’ रुग्णालयाचा लाभ घेतला आहे. तसेच या हॉस्पिटल मध्ये 150 च्या वर

डॉक्टर, कर्मचारी असून यातील अनेक जण मानधनावर काम करत असून अनेक पदे गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. आरोग्य

विभागाने लवकरात लवकर ह्या यंत्रणा सुरू करून रुग्णांना आधार देण्याची गरज आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य