Thursday, 17 January 2019

शरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्प ठिकाणी देणार भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

नाणारमध्ये होणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रकरणी ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवार यांनी आपण नाणार प्रकल्पाच्या प्रस्तावित जागी भेट देऊन तिथली वस्तूस्थिती समजून घेणार असल्याचं सांगितलं. यासाठी शरद पवार 10 मे'ला नाणार प्रकल्पाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.

यावेळी पवार यांनी प्रकल्प जागेची पाहणी करुन तेथील वस्तूस्थिती जाणून घेतील आणि त्यानंतर आपली नाणार प्रकल्पाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मतही यावेळी व्यक्त केलं.

नाणारमध्ये होणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात येऊ शकते असं इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, स्थानिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य