Monday, 17 December 2018

3 दिवसांनंतरही कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडची आग कायम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर पुन्हा एकदा आग लागली आहे. आग इतकी प्रचंड प्रमाणात होती की या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होत.

तब्बल तीन दिवसानंतरही या डम्पिंग ग्राऊंडवरील आग आटोक्यात आलेली नाही. मनसेने महापालिका दालनात आयुक्तांच्या फोटोला बांगडय़ाचा हार घालून याबाबतच आंदोलन करण्यात आलं आहे. तर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनाबाहरे ठिय्या आंदोलन केले गेले.

डंपिंगच्या आगीच्या प्रश्नावर नागरीकांच्या बाजूने मनसे, शिवसेना आणि काँग्रेस रस्त्यावर उतरली असली तरी ही सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीने याबाबतच मौन बागळले आहे. डंपिंग ग्राऊंड हटविण्याचे आदेश न्यायालयाने देऊन देखील अद्याप का हटविले नाही असा संतप्त सवाल डंपिंगने त्रस्त असलेल्या नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य