Monday, 17 December 2018

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाटयावर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

पालघर लोकसभेचे दिवंगत खासदार चिंतामन वणगा यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील भाजप मधील अंतर्गत गटबाजी चव्हाटयावर आली आहे. पालघर जिल्ह्यातील प्रदेश कार्यकारणीचे सदस्य बाबाजी काटोले यांच्याकडून गटबाजी केली जात असल्याचा आरोप केलाय. पालघर तालुका समन्वय प्रमुख मधुकर पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तक्रार पत्र दिलं आहे.

वणगा यांच्या मृत्यूनंतर पालघर लोकसभा जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी लवकरच पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षाच्या हालचाली सुरु झाल्या असून बाबाजी काटोले यांच्याकडून पक्षात गट बाजी केली जात असल्याचे या पत्रात मधुकर पाटील यांनी नमूद केलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य