Monday, 17 December 2018

भाजपचे काँग्रेसच्या पावलावर पाऊल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

राजकारणात घराणेशाहीची परंपरा वर्षानुवर्षे रुजत चालली असून काँग्रेसनंतर आता भाजपनेही घराणेशाहीची परंपरा पाळण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. पालघरच्या नवनिर्वाचित वाडा नगरपंचायतीत भाजपकडून घरानेशाहीची परंपरा रुजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या कन्या निशा सावरा यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळाली असली तरी काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत भाजपची वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे काही वावगं ठरणार नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य