Sunday, 16 December 2018

लखलखीत दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघाला रायगड किल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

स्वराज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या किल्ले रायगडावर पाडव्याच्या मुहुर्तावर आव्हान गिर्यारोहक या संघटनेसह शिवभक्तांनी दिपोत्सव साजरा केला. पालखी दरवाजा, राजदरबार, मेघडंबरी, होळीचा माळ, जगदीश्वर मंदीर, समाधीस्थळ, नगारखाना इत्यादी प्रमुख ऐतिहासिक स्थळांसह ठिकठिकाणी हजारो पणत्या पेटवून दिवाळी साजरी करण्यात आली. जागोजागी पेटलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण रायगड परिसर उजळून निघाला होता. गडद अंधार दाट धुके आणि गार वारा यामुळे वातावरण भारावले होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य