Sunday, 18 November 2018

येत्या वीकेंडला नक्कीच गाठा ओव्हरफ्लो भुशी डॅम...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे

पर्यटकांसाठी सर्वात आवडतं पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. लोणावळा हे मुंबईकर आणि पुणेकर पर्यटकांसाठी जवळचं आणि हक्काचं पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात लोणावळ्याकडे पर्यटकांचे पाय ओढावतात. मात्र लोणावळ्याचं आकर्षण असलेलं भुशी धरण आता भरभरून वाहत आहे.

शुक्रवारपासूनच पावसाने जोर धरला होता. गेली चार दिवस झालेल्या पावसामुळे आज अखेर पाणी ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. 

पर्यटक याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. आता भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. 

  • लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे.
  • धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागले.
  • येत्या वीकेंडला जर पर्यटनासाठी बाहेर पडणार असाल तर भुशी धरणाला नक्कीच गाठ द्या 
  • वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी
  • या वीकेंडलाही लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी

भुशी धरणावर जाण्याचा विकेंड प्लान करताय तर आधी ही बातमी वाचा

लोणावळ्यातील भुशी डॅमवर No Entry

loading...

Top 10 News

राशी भविष्य