Tuesday, 22 January 2019

नाझरे धरणात निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जेजुरी गडाच्या पायऱ्या धबधब्याच्या रुपात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

जेजुरी जवळच्या नाझरे धरणात आलेल्या टॉरनेडोनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जेजुरी गडाच्या पायऱ्या धबधब्याच्या रुपात पाहायला मिळाल्या. अवघ्या काही तासात इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला.

जेजुरीकरांनी आतापर्यंत पहिल्यांदाच पायऱ्यांवरुन असं पाणी वाहताना पाहिलं. जेजुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

नाझरे धरणात काल सायंकाळी निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार नागरिकांना पाहवयास मिळाला. नाझरे धरणातील पाणी चक्रीय वादळामुळे आकाशात गोलाकार स्वरुपात काही मीटरपर्यंत उंच उडताना नागरिकांना पाहायला मिळालं.

हा व्हिडीओ नाझरे धरणा जवळून  जाणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

नदीची पुजा करण्यासाठी तिथे काही भाविक येतात, त्या भाविकांना पुजेचे साहित्य विकण्यासाठी या नदीच्या तिरावर काही विक्रेते आहेत, त्यानी हा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला होता.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य