Thursday, 17 January 2019

घर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

आपण बोलणारा आणि अण्णा म्हणणारा कोंबडा पाहिलाय. सांगलीत एका कोंबड्याची चक्क कुत्र्यासोबत मैत्री जडलीय. विशेष म्हणजे हा कोंबडा मालकाच्या घराऐवजी 24 तास कुत्र्यांच्या कळपातच असतो. दोन वर्षे वयाच्या या कोंबड्याला कुत्र्याचा आणि त्याच्या पिलांचा इतका लळा लागला आहे की, हा कोंबडा या कुत्र्याच्या कळपापासून बाजूलाच जात नाही.

जिकडे कुत्री जातील त्यांच्यामागे हा कोंबडा जातो आणि कुत्र्याच्या अंगावर बसून दंगामस्तीही करतो. एवढेच नाही तर कुत्र्याच्या अंगावर खेळणे, आणि कुत्री जिकडे जातील तिथे मागोमाग फिरणारा कोंबडा सांगलीत चर्चेचा विषय बनलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य