Thursday, 17 January 2019

सांगलीत तरुणाची पक्षी बचाव मोहिम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील शाहरुख पठाण युवकाने गेल्या 3 वर्षांपासून पक्षी बचाव मोहीम राबवण्यास सुरुवात केलीये. त्याने डोंगरमाथ्य़ावर छोटीछोटी तळी बांधून पक्षासाठी पाण्याची सोय केलीये. तर, याच ठिकाणी पक्षाच्या अन्नाचीही सोय केलीय.

घरापासून जवळपास 50 किलो मिटरच्या परिसरात त्याने ही मोहिम राबवलीय. त्याच्या या उपक्रमाला आता कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून त्याचे नातलगही सहकार्य करत आहेत. एकीकडे माणसे माणसांबरोबर माणूसकीने वागायचे विसरु लागले असतांना शाहरुख सारख्या युवकांचा हा उपक्रम कौतूकास्पद आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य