Saturday, 15 December 2018

पंढरपूरकरांवर पाणी-संकट; दिवसाआड होणार पाणी पुरवठा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचा पाणीपुरवठा अपुरा आहे. त्यामुळे पंढरपूर शहरावर सध्या पाण्याचं संकट निर्माण झालंय.

शहराला गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो. उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर हे बंधारे भरून घेतले जातात.

त्यामुळे पंढरपूर शहराला रोज एक ते दोन तास जवळपास एक लाख ते सव्वालाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होतो. पण सध्या बंधाऱ्यात पंधरा ते वीस दिवस पुरेल इतकेच पाणी आहे.

त्यामुळे उद्यापासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याच नियोजन नगरपालिकेन केल आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य