Monday, 17 December 2018

सुयोग्य वधू; 'विडी कार्ड' मुलींसाठी खूप मोठं वरदान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

लग्नासाठी वधू-वरांच्या काही वेगवेगळ्या आशा -अपेक्षा असतात. म्हणजे कोणाला उच्चशिक्षित, कोणाला श्रीमंत तर कोणाला पुढारलेल्या विचारांचा साथीदार हवा असतो. तर कोणाची गाडी गुण जुळवण्यात अडकलेली असते. पण, सोलापूर शहरात मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे ‘विडी कार्डधारक’ मुलींना लग्नासाठी जास्त मागण्या येऊ लागल्या आहे. ‘विडी कार्डधारक’ मुली याच ‘सुयोग्य वधू’ आहेत अशी वरपक्षाची समजूत झालीय. सोलापूरच्या विडी कामगार महिल्यांच्या मुलींचं शिक्षण चागलं झालं असतं. मात्र, याच्याकडे विडी कार्ड असल्याने दररोज त्यांना लग्नाची मागणी घालण्यासाठी अनेक वर आणि वरपिता त्यांच्या घरी येतात.

विडी कामगार मुलींच्या म्हणण्यानुसार हे 'विडी कार्ड' म्हणजे आमच्यासाठी एक खूप मोठं वरदान असल्याचं सांगतात. त्यामुळे येणाऱ्या काळात लग्नासाठी आम्हाला कधीही अडचण येणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विडी कार्डमुळे मुलींना हुंडाही द्यावा लागत नाही. कारण विडी कार्ड असलं की नोकरीची हमी असते. शिवाय प्रोव्हिडंट फंड, बोनस, वैद्यकिय मदत अशा सुविधांचा लाभही मिळतो. त्यामुळे या विडी कार्डचं मुलींच्या जीवनात अधिक महत्त्व आहे. शिक्षण असलं तरी नोकरीची हमी नव्हती. मात्र आता विडी कार्डमुळे नोकरीची हमी आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य