Monday, 17 December 2018

सांस्कृतिक शहर नशेच्या आहारी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

शिक्षणाचं माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यात सध्या तरुण व अल्पवयीन मुले व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत चाललयं. धक्कादायक म्हणजे व्यसनांच्या आहारी गेलेल्या किमान 14 ते 15 तरुणी दररोज व्यसनमुक्ती केंद्रात येत आहेत. महिलांमध्ये दारू, सिगारेटसोबतच आता हुक्का, गांजा व अफूची नशा करण्याचे प्रमाण वाढल्याचं दिसून येतं आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

काही तरुणी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणूनही गांजा, अफूचे सेवन करतात. विद्येचं माहेरघर, शांत आणि सांस्कृतिक शहर आता नशेच्या आहारी गेल्याचं दिसून येतयं. आयटी हब ते स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या या शहरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून काम करतांना पाहायला मिळत आहेत, ही स्तुत्य बाब आहे. पण दुसरीकडे याच महिला व्यसनांच्या वाटेवर जात असल्याचे समोर आले आहे. या महिला व तरुणी व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींचे प्रमाण मोठे आहे.

महाविद्यालयीन तरुणी हुक्का तसेच गांजा आणि अफू या अंमली पदार्थांचे सेवन करतात. काही तरुणी नशेसाठी औषधी गोळ्यांचेही सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे. कामाचा ताण आणि कमी वयात हातात आलेला भरमसाट पैसा यामुळे या व्यासनाधीनतेला बळकटी मिळत आहे. पुण्यात दररोज लाखो महिला नोकरी व शिक्षणानिमित्त घराबाहेर पडतात. परंतु न कळत त्या या व्यसनांच्या आहारी जात आहेत.

तरुणींमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर मद्यपानाचा क्रमांक लागतो. तरुण-तरुणींच्या व्यसनमुक्तीसाठी पुण्यातील कृपा फाउंडेशन काम करत आहे. या संस्थेत महिनाभरात 4 ते 5 महिला दाखल होतात. तसेच राज्यभरातून जवळपास चाळीस महिला व तरुणी व्यसन मुक्ती केंद्रात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थांकडून त्यांच्यावर उपचार करून, त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य