Tuesday, 11 December 2018

बस स्थानकात चोरी करणारी टोळी सीसीटीव्हींमध्ये कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे येथील स्वारगेट एस टी स्टँडवर प्रवाशांच्या बॅगा चोरणारी एक टोळी सक्रिय आहे. जे प्रवासी शिवनेरीमधून प्रवास करणातात त्या प्रवाशांचे अवजड सामान  डिक्कीत ठेवण्यात येते. डिक्कित ठेवलेल्या या बॅगांमधून किंवा त्य़ांच्या सामानाची ही टेळी चोरी करते. या टोळीत एकूण चार जणांचा समावेश असून ही टोळी पुण्यामध्ये सक्रिय झाली आहे.

प्रवासी आपलं लॅगेज डिक्कीमध्ये ठेवून गाडीत बसल्यानंतर ही टोळी प्रवाशांच्या बँगेमधून सामान काढून, त्यांच्या बँगा घेऊन पसार होतात. प्रवासी भांडुप पम्पिंग, दादर, ठाणे येथे उतरल्या नंतर त्यांच्या लक्ष्यात येते की आपल्या बँग चोरीला गेल्या आहेत त्यांच्या याच चोरीचा थरार शिवनेरी बस स्थानकाच्या सीसीटीव्हींमध्ये कैद झालीय. अशाच बँग चोरीला गेलेले श्री अशोक चित्रे हे स्वारगेट येथे शिवनेरी बस मधे बसुन ठाण्यातील वंदना बस स्टँड येथे उतरले. उतरल्या नंतर आपली बँग घेण्यासाठी बसच्या डिक्कि येथे गेले असता त्यांची बँग त्यांना मिळाली नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले आपली बँग चोरीला गेली आह.

दरम्यान, त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी तक्रार दिली. पोलीसांच्या प्राथमिक चौकशी मध्ये ही चोरी स्वारगेट एसटी स्टँड वर झाल्याचे सीसीटीव्ही मध्ये निष्पन्न झाले.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य